आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रायगड:खेळता-खेळता कारचा दरवाजा झाला लॉक, 4 आणि 6 वर्षीय चिमुकल्या भावंडांचा गुदमरून मृत्यू

रायगड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारमध्ये लॉक झालेल्या दोन भावांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील महाडजवळ असलेल्या नांगलगावात घडली आहे. कुटुंबियांनी कारची काच फोडून दोघांना बाहेर काढले आणि हॉस्पीटलमध्ये नेले. पण, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

खेळता-खेळता चुकून कारचा दरवाजा लॉक झाला

रायगड पोलिसांनी सांगितले की, महाड शहराजवळील नांगलगावात एका होंडा सिटी कारमध्ये 6 वर्षीय सुहेल खान आणि 4 वर्षीय अब्बास खान खेळत होते. खेळता-खेळता अचानक त्यांची कार सेंट्रल लॉक झाली. घरातून अचानक गायब झालेल्या चिमुकल्यांना कुटुंबियांनी सगळीकडे शोधले, पण त्यांचे लक्ष कारकडे गेले नाही. अखेर चार तास कारमध्ये बंद झाल्याने गुदमरुन दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला.

दोघांच्या चेहऱ्यातून रक्त येत होते

सगळीकडे मुलांची शोधा-शोध सुरू असताना कुणीतरी कारमध्ये पाहिले, तेव्हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. कुटुंबियांनी घाई-घाईत कारची काच फोडून दोघांना हॉस्पीटलमध्ये नेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. हॉस्पीटलमध्ये नेत असताना त्यांच्या चेहऱ्यातून रक्त येत होते. हॉस्पीटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser