आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तळोदा:अस्लवाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी, तळोदा तालुक्यातील घटना

तळोदाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मोहिदा येथील अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची दुर्देवी घटना ताजी असतांनाच आज सकाळी तालुक्यातील बेडापाडा येथे गावा जवळील शेताच्या रस्त्यावर अस्वलाने एक बालक व वयस्क व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेट त्या बालकास जबर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.      नेहमीप्रमाणे शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेले नारायण गणा वळवी (वय 58) यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला. दरम्यान त्यांनी आरडा ओरड करत गावाच्या दिशेने पळ काढला यावेळी तिकडून येत असलेला अनिल जयसिंग वसावे (वय 11) या  बालकाला अस्वलाने लक्ष केले. दरम्यान गांवकऱ्यानी आरडाओरडा केल्याने अस्वलाने तिथून धूम ठोकली. अस्वलाच्या या हल्ल्यातून सुदैवानं दोघ बचावले, या हल्ल्यात बालकाच्या डोक्यावर ओठावर, छातीवर पाठीवर ओरबडल्याचा जखमा आहेत. यात त्याचा हात फेकच्चर झाला आहे. तर नारायण यास अस्वलाने पार्श्वभागावर पकडल्याने जबर दुखापत झाली आहे. सदर घटनेनंतर वनविभागाकडून घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.               तळोदा तालुक्यातील पश्चिम भागांत अस्वलाचा अधिक वावर असून वाल्हेरी, ढेकाटी, अमोनी, इच्छागव्हाण, राजविहिर, दलेलपूर, बुधावल, सोमावल, कुंडलेश्ववर, शिर्वे, या भागात अस्वलाचा मुक्त संचार सदैव दिसून येतो. साधारणपणे २०० अस्वल तळोदा वनक्षेत्रात असल्याचे समजते.  तसेच मागील पंधर वाड्यात बिबटयानेदेखील तालुक्यातील विविध  क्षेत्रात कुत्रा व इतर प्राण्यांवर हल्ले केले आहेत, त्यात अस्वलाकडून सलग दोन तीन दिवसात दोन हल्ले वनविभागासाठी डोके दुःखी ठरत आहे. एका हल्ल्यात तर एक तरुण शेतकऱ्याचा बळी गेला आहे. त्यामुळे आता वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...