आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, पण अन्याय होऊ देणार नाही- उदयनराजे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारणाक चांगलेच तापले आहे. यातच, भाजप खासदार उदनयराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणार,' असे वक्तव्य उदयनराजे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

यादरम्यान उदयनराजे म्हणाले की, 'मी नेहमी मनातून बोलतो, कधीच राजकारण करत नाही. मराठा आरक्षणावर सरकारने काही केले तर ठीक, नाहीतर राजीनामा देऊन टाकणार. फक्त मराठा समाजासाठीच नाही इतर कोणावर अन्याय होत असेल, तर त्यांच्यासाठीही लढणार. प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे,' असे उदयनराजे म्हणाले.

पुढे बोलताना उदयराजे म्हणाले की,'सध्या लोकशाही आहे. राजेशाही असती तर दाखवलं असतं. माझे एकच म्हणणे आहे, अन्याय होत असे तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखे वागायला हवे. लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून जाता, त्याचे भान ठेवायला हवे', असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.