आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हल्लाबोल:...तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परीषद घेत विरोधकांवर हल्लाबोल केला

राज्य सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'विरोधकांचे मागचे वर्ष सरकार कधी पडेल? याचे मुहूर्त शोधण्यात गेले. त्यामुळे सरकारने काय कामे केली त्याकडे त्यांचे लक्ष गेले नाही,' असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले. तसेच, दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? अन्नदात्याला देशद्रोही ठरवणे आपली संस्कृती नाही, असाही टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

'सरकार अनेक संकटातून मार्ग काढत आहे'

'करोना संकट असेल, निसर्ग वादळ असेल, अवकाळी पाऊस अशी अनेक संकटे राज्यावर आली तरीही त्यातून हे सरकार मार्ग काढतं आहे. मराठा आरक्षण देत असताना किंवा कोणतेही आरक्षण देत असताना कुणाचेही हक्क मारले जाणार नाही. कुणाचेही आरक्षण काढून कुणालाही दिले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser