आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला; नारायण राणेंचे सरकारवर टीकास्त्र

रत्नागिरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर टीका केली

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषध ेगऊन सरकारवर जोरदार टीका केली. 'सरकारला एक वर्ष पूर्ण झालं, पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला,' अशी टीका नारायण राणे यांनी केली.

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. 'सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला. हा त्यांचा पायगुण. कोरोना आला आणि संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचा कोणत्याच क्षेत्रात अव्वल नंबर आला नाही. इतकी महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. पण कोरोनामुळे एकट्या महाराष्ट्रात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला,' अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी सरकारवर कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप लावले आहेत. 'कोरोनावर उपाय योजना करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनाच्या नावाने राज्यात 3 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. ठाकरे सरकार निकम्मं आहे. त्यांनी काहीच कर्तृत्व केलेले नाही. या सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम', असे टीकास्त्र राणेंनी दागले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser