आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र पोलिस विभागातील सर्वात जेष्ठ अधिकारी आणि 1986 बॅचचे IPS संजय पांडे सुट्टीवर गेले आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहीलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, 'पुन्हा सेवेत येण्याबाबत विचार करावा लागेल.' बुधवारी DG होमगार्डवरुन महाराष्ट्र स्टेट सिक्योरिटी फोर्स (MSF) मध्ये बदली झाल्यानंतर संजय पांडेंनी हे पत्र लिहीले आहे.
महाराष्ट्र सरकारने संजय पांडे यांची बदली करुन त्यांच्या जागी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना होमगार्डचा DG बनवले आहे. परमबीर सिंह यांना अँटीलिया केसमध्ये सचिन वाझेंच्या अटकेनंतर पदावरुन काढण्यात आले आहे.
'सरकारने नेहमी साइड पोस्टिंगमध्ये ठेवले'
पांडे म्हणतात की, कोणतेही सरकार आले, तरीदेखील मला नेहमी साइड पोस्टिंगमध्ये ठेवण्यात आले. विद्यमान सरकारही माझे करिअर उद्धवस्त करत आहे. पांडे जेव्हा 1992-93 मध्ये DCP होते, तेव्हा त्यांची पोस्टिंग धारावीमध्ये होती. ते या झोनचे पहिले DCP (पोलिस उपायुक्त) होते. संवेदनशील परिसरात पोस्टिंग असूनही त्यांच्या कार्यकाळात परिसरात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही. 1997 मध्ये झालेल्या मोठ्या घोटाळ्यात पांडे यांनी केलेल्या तपासाचे कौतुक आजही पोलिस विभाग करते.
पांडे यांच्या पत्रामुळे सरकार अडचणीत येऊ शकते
संजय पांडे यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकते. पांडे पत्रात म्हणतात की, सरकार आपल्या चुका लपवण्यासाठी आमच्यासारख्या जेष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करते. त्यांनी कमीत-कमी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, असे पांडे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.