आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांततेचे आवाहन:महाविकास आघाडीच्या सभेला गालबोट लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न; विरोधी पक्षनेते दानवे यांचा आरोप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर मध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला गालबोट लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. दोन समाजामध्ये वाद निर्माण करून असे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यामुळे सभेला येणाऱ्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांतता ठेवण्याचा आवाहन अंबादास दानवे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या या सभेत तिनी पक्षातील नेते मार्गदर्शन करणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेच्या काही दिवस आधीच छत्रपती संभाजीनगर मध्ये तणावाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सभेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मात्र, पोलिस प्रशासनाच्या वतीने या सभेसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी पंधरा अटी घालण्यात आल्या आहेत. असे असले तरी सभेच्या दिवशी अप्रिय घटना घडवण्याचा आणि सभेला गालबोट लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

दरम्यान माजी मंत्री सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, आ.अनिल परब, आ.सुनिल प्रभू, यांनी सभेच्या स्थळाची पाहणी करून आढावा घेतला.
दरम्यान माजी मंत्री सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, आ.अनिल परब, आ.सुनिल प्रभू, यांनी सभेच्या स्थळाची पाहणी करून आढावा घेतला.

सभेसाठी खालील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्ते नागरिकांच्या वाहनपार्किंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची नोंद सभेसाठी येणाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना मविआच्या सभेचे संयोजक अंबादास दानवे यांनी केली आहे. सभेसाठी मराठवाडा व बाहेर गावावरून येणाऱ्यांना जुबली पार्क येथे सोडून कर्णपुरा व कासलीवाल मैदान पार्किंग येथे वाहने लावावीत. सभेसाठी येणाऱ्या संभाजीनगर शहरातील गाड्या या विवेकानंद कॉलेज, लॉ कॉलेज, जिल्हा परिषद मैदान येथे पार्क कराव्यात. तसेच सभेसाठी येणारे आमदार खासदार यांची वाहने सारस्वत बँकेच्या मागे व अंजली सिनेमा पार्किंग येथे पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.