आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांची टोलेबाजी:उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये चौथे, लवकरच नंबर वन ठरतील; भाजपचा ग्राफ कोसळतोय, जनआशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झाला आहे. कोरोना महामारिमध्ये संयमाने राज्याचा चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये चौथे स्थान मिळाले आहे.

इंडिया टुडेने नुकत्याच केलेल्या सर्व्हेत देशातील 11 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. 11 जणांच्या यादीत भाजपच्या केवळ दोनच मुख्यमंत्र्यांना स्थान मिळवता आले आहे. भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री या टॉप पाचमध्ये नाही, याचं आश्चर्य वाटतं. खरं तर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ज्या प्रकारे देशात भाजपचा ग्राफ कोसळत आहे. त्याचाच परिणाम म्हणावं लागेल, असेही राऊत म्हणाले.

देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत पहिले स्थान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना पसंती मिळाली आहे. दुसर्‍या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, तिसरे स्थान केरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन, चौथे स्थान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर पाचवे स्थान पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना मिळाले.

भाजपचे आसाममधील मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अकरा जणांच्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र, पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. योगी आदित्यनाथ यांना तर या सर्व्हेत केवळ 29 टक्के लोकांनी पसंती दिल्याचे इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेत स्पष्ट झाले आहे.

जन आशीर्वाद यात्रा तिसऱ्या लाटेला आमंत्रण - राऊत

जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात. ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...