आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंचा ठाकरे सरकारवर ​​​​​​​निशाणा ​​​​​​​:महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊतांसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी आज किंवा उद्या कधीना कधी सरकार पडेल, असा घाणाघात नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर केला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये असताना युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

संजय राऊत यांनी हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे वक्तव्य केले. त्याबाबत विचारलं असता राऊतांनी एकदा तर 25 वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही… अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केली. तसेच चंद्रकांत पाटील मंत्री बनण्यासाठी शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असेही राणे नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...