आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निसर्गाचा प्रकोप:राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव परिसरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच धावपळ उडाली.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे. गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. दरम्यान आता शेतकऱ्यांनी शेतात पिक घेण्यास सुरुवात केली होती. मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. आज राज्यातील नाशिक, बुलडाणा, वाशिम, अमरावतीमध्ये वर्धा परभणी, चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव परिसरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच धावपळ उडाली. काढणीला आलेल्या गहू, द्राक्ष बागांना मोठ्याप्रमाणात गाडपिटीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. पिंपळगाव, आहेरगाव. पालखेड, बेहेड आदि भागात मुसळधार पावसाने झोडपले आहे. हवामान खात्याकडून येत्या तीन दिवसात अकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. त्यानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक परिसरांमध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशकासोबतच धुळ्यामध्येही गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. धुळे तालुक्यातील उडाणे गोताने चौगाव या ठिकाणी गारपिटीमुळे गहू आणि हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...