आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीला जाणारच:पोलिस आयुक्तांनी नोटीस बजावल्यानंतरही भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले- मला अमरावतीला जायचेच आहे!

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते किरीट सोमय्या उद्या अमरावती दौऱ्यावर जात आहेत. 14 नोव्हेंबर रोजी ट्विट करुन त्यांनी याबाबत माहिती दिली होती. मात्र सध्याच्या तणावच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांनी सोमय्या यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. नोटीस बजावल्यानंतरही किरीज सोमय्या अमरावती दौऱ्यावर ठाम आहेत. ते म्हणाले मला अमरावतीला जायचेच आहे. तिथल्या लोकांच्या व्यथा आणि तिथली स्थिती समजून घ्यायची आहे. असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमरावतीमध्ये हिंसा घडली असल्यामुळे कलम 144 नुसार संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनी अमरावतीचा दौरा रद्द करावा अशी नोटीस अमरावती पोलिसांनी दिली आहे. अमरावतीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात आली असून या सार्वजनिक शांततेस बाधा न येण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण अमरावती दौरा रद्द करावा असे अमरावती पोलिसांनी किरीट सोमय्या यांना म्हटले आहे.

सोमय्यांना अमरावती पोलिसांची नोटीस
सोमय्यांना अमरावती पोलिसांची नोटीस
बातम्या आणखी आहेत...