आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली चकमक:आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह हत्यारासह सापडला, चकमकीतील नक्षलवाद्यांच्या मृतकांची संख्या 27 वर

हेमंत डोर्लीकर | गडचिरोली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली जिल्ह्यातील गॅरापत्ती कोटगुल जंगल परिसरात 12 नोव्हेंबर रोजी सकाळी सी-60 जवान आणि नक्षलांमध्ये चकमक उडाली होती. यात सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडे सह 26 नक्षल्यांचा खात्मा झाला असून सदर परिसरात शोध मोहिम राबवित असताना मंगळवारी हत्यारासह एका पुरूष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे. सुखलाल परचाकी (31) असे त्या नक्षलवाद्याचे नाव असून तो डी.व्ही.सी मेंबर होता.

16 पैकी 8 नक्षल्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन

12 नोव्हेंबर रोजी सकाळी सी-60 जवान कोटगुल मर्दिनटोला जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधादूद गोळीबार केला. त्याला प्रत्यूत्तर देत सी-60 जवानांनी देखील गोळीबाराला सुरूवात केली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलांनी जंगलाकडे पळ काढला. या चकमकीनंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडे सह 26 नक्षलांचे मृतदेह आढळून आले होते. ओळख पटलेल्या 16 पैकी 8 नक्षल्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दरम्यान मंगळवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्याठिकाणी असलेले जिवंत बॉम्ब नष्ट केले.

अशी झाली होती कारवाई

12 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 2.30 अशी साडे आठ तास चकमक चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांना जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कमांडो तुकड्यांनी नक्षल्यावर सकाळी 6 वाजताच्या सुमारास हल्ला चढवला. यात पोलिस व नक्षल्यांत तुंबळ लढाई झाली. कोरची येथील सी-60 कमांडोच्या 5 व गडचिरोली येथील दहापेक्षा अधिक अशा सुमारे 200 जवानांनी नक्षल्यांना डोके वर काढू दिले नाही. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला होता.

बातम्या आणखी आहेत...