आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनगणना:जातीनिहाय जनगणेसाठी बिहारमधील सत्ताधारी-विरोधक एकवटले, असं चित्र महाराष्ट्रात दिसलं असतं तर बरं झालं असतं- रोहित पवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीसाठी बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय मतभेद बाजूला सारत पंतप्रधानांची एकत्रित भेट घेतली. असेच चित्र आपल्या राज्यातही दिसलं असतं, तर बरं वाटलं असतं. पण हरकत नाही याबाबत राज्यातील मविआ सरकार योग्य दिशेने प्रयत्न करत आहे. असं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे

.

केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा उपलब्ध करून दिला तर आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यास मोठी मदत होईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि देशातील इतर राज्यांनीही हीच मागणी केली आहे. त्यामुळं केंद्र सरकार यात निश्चित लक्ष घालेल, ही अपेक्षा आहे, असंही रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींना टॅग करून म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...