आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप:एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब, थोरात आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपावर तोडगा काढण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊले उचलल्याचे दिसत आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली. यावेळी फडणवीसांनी काही सूचना सुचवल्या असून त्याचा विचार केला जाईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अनौपचारीक चर्चा झाल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनौपचारिक चर्चेमध्ये त्यांनी देखील काही सूचना केल्या. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना देखील राज्याचा कारभार माहिती आहे. त्यांनी ज्या सूचना केल्या त्यावर शासनाचे मत देखील घेऊ असे आम्ही त्यांना सांगितले, असे ॲड. अनिल परब म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...