आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून संजय राऊतांची ओळख आहे. बाळासाहेबांच्या ठाकरी भाषेचे संस्कार संजय राऊतांवर झालेत असे म्हटले जाते. पण केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईने संजय राऊत यांचा जीभेवरचा ताबा सुटलाय की काय असे वाटू लागले आहे. असे वाटण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांतील संतापात त्यांची जीभ घसरल्याचे दिसून आले आहे. यावेळी बोलताना त्यांनी मिळालेली शिवराळ भाषेचा उपयोग केला आहे.
राज्यातील मविआ सरकारचे शिल्पकार असे राऊतांना म्हटले जाते. भाजपपासून वेगळे होत मविआ सरकार स्थापन करेपर्यंत संजय राऊतांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार आणि संपादक असलेल्या राऊतांनी अशा शिवराळ भाषेत किरीट सोमय्यांवर टीका केल्याने त्यांचा जीभेवरचा ताबा सुटत चालला आहे? असे वाटल्याशिवाय राहत नाही.
नेमके काय म्हणाले संजय राऊत?
किरीट सोमय्या येडXX आहे. ही कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. ही कीड संजय राऊत आणि शिवसेना संपवणार, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. पराक्रम काय सांगतो मला? हे सगळे महाराष्ट्र आणि देशद्रोही आहे. आयएनएस विक्रांतच्या नावावर तुम्ही जनतेकडून कोट्यावधी रुपये गोळा करता? आम्ही तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणताय? हा देशद्रोह आहे, देशभावनेशी खेळण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाने केला आहे, वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.