आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथाभाऊंमागे शुक्लकाष्ठ:एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस; जप्त मालमत्ता 10 दिवसांत रिकामी करण्याचे आदेश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली असून, नोटीसमधून जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने मागील महिन्यात खडसेंची संपत्ती जप्त केली होती. हीच जप्त करण्यात आलेली मालमत्ता रिकामी करण्यासाठी ईडीने नोटीस दिली आहे.

ईडीने गेल्या महिन्यात खडसेंचा लोणावळ्यातील बंगला, उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील 3 फ्लॅट आणि 3 मोकळे भूखंड जप्त केले होते. या जप्त केलेल्या एकूण प्रॉपर्टीची किंमत ही बाजार भावानुसार किंमत 5 कोटी 73 लाख रुपये इतकी आहे. ईडीने दिलेल्या नोटीशीनुसार, 10 दिवसांमध्ये मालमत्ता रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मनी लाँडरिंग अंतर्गत ईडीने एकनाथ खडसे यांना ही नोटीस बजावली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळा, सूरत येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंड, जमिनी आदी मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश चौधरी, इन्शिया मुर्ताझा बादलावाला, उकानी आदी या सर्व मालमत्तांचे मालक आहेत. या सर्व मालमत्तांवर ईडीने पीएमएलए अॅक्ट अंतर्गत ऑगस्ट 2021 मध्ये टाच आणली होती. 30 मे रोजी खडसेंना ही नोटीस बजावण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...