आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Vaccination At Mumbai Municipal Corporation Centers Will Be Closed Today Due To Shortage Of Vaccines; News And Live Updates

कोरोना महामारी:लसींच्या कमतरतेमुळे मुंबई महानगरपालिका केंद्रांवरील लसीकरण आज राहणार बंद

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खाजगी लसीकरण केंद्रे मात्र सूरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले

देशात एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे कोरोनावर रामबाण उपाय असलेली लसीकरण मोहीम थंडबस्त्यात पडली आहे. देशातील अनेक राज्यांत लसींच्या कमतरतेमुळे लसीकरण केंद्र पडण्याच्या मार्गावर आहेत. याच पार्श्वभूमीवर कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबईतील काही लसीकरण केंद्रे आज बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली.

यामध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांचा समावेश असणार आहे. यावितिरिक्त खाजगी लसीकरण केंद्रे मात्र सूरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य निर्णय घेवून मुंबईतील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.

दरम्यान, आज दिवसभरामध्ये पुरेसा लससाठा उपलब्ध होईल त्यानुसार उद्या पुन्हा लसीकरणाची सुरुवात केली जाईल. खाजगी लसीकरण मात्र सुरू राहणार आहे. अनेक खाजगी रुग्णालयांत लसींचा साठा संपल्याने समस्या उद्भवत असल्याची चर्चा सुरु आहे. लसींचा साठा ज्याप्रमाणे उपलब्ध होईल त्यानुसार पुढील लसीकरण सुरु राहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...