आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:हिंगोलीत 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरवात, 58 हजार लाभार्थ्यांना दिली जाणार लस

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात १५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवारपासून ता. ३ सुरवात झाली असून प्रत्यक्ष शाळेत जाऊन लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील ३७० शाळेतील ५८ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

हिंगोली जिल्हयात नियमित लसीकरणा सोबतत १५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार आरोग्य विभागाने लसीकरणाची तयारी सुरु केली होती. यामध्ये या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आली आहे. त्यानुसार ३७० शाळांमधून ५८ हजार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

त्यानुसार आज सरजूदेवी कन्या विद्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. दीपक मोरे, डॉ. नंदिनी भगत यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरवात झाली आहे.

या सोबतच जिल्ह्यातील सुमारे ३० विद्यालयात आज लसीकरणाला सुरवात झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत जाऊन लाभार्थ्यांना लस दिली जाणार असून लाभार्थ्यांनीही स्वतःहून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...