आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंदिरांसाठी आंदोलन:राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी वंचितचे आंदोलन; 'आम्ही नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो आहेत'- प्रकाश आंबेडकर

पंढरपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने विश्व वारकरी सेवासह पंढरपुरात आंदोलन केले. यावेळी शेकडोच्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते आणि वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. 'आम्ही नियम मोडण्यासाठीच इथे आलो आहोत', अशी प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली.

माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'मंदिरे उघडण्यासाठीच ही गर्दी जमली आहे. मंदिरे खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत नाही, हेच आम्हाला सरकारला दाखवायचे आहे. कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, आता त्यांची वाट पाहात आहे. त्यांचा निरोप काय येतो ते पाहू, त्यानंतर मी विठ्ठल मंदिरात जाऊ,' असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

या आंदोलनादरम्यान, विठ्ठल मंदिर परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. यादरम्यान, आंबेडकर यांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.