आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Varavara Rao Bail News And Update | Bombay High Court Granted Bail To 81 Year Old Bhima Koregaon Accused Varavara Rao

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीमा कोरेगाव प्रकरण:उच्च न्यायालयाकडून 81 वर्षीय वरवरा राव यांना सशर्त जामीन मंजूर, युएपीए कायद्यातंर्गत झाली होती अटक

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राव यांच्याशी संबंधित 3 याचिकांवर सुनावणी

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कवी-कार्यकर्ते वरवर राव(वय 81) यांना सशर्त जामी मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या जामीनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी याचिका दाखल केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

वरवर राव नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर वरवरा राव यांच्याकडून वैद्यकिय कारणास्तव जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, राव यांना जामीन मिळाला असला, तरी गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेता त्यांना त्यांच्या हैदराबादमधील घरी जाण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली नाही. पुढील सहा महिन्यांकरीता त्यांना NIA च्या अधिकार क्षेत्रातच राहावे लागेल आणि गरज पडल्यास तपासात सहकार्य करावे लागेल.

राव यांच्याशी संबंधित 3 याचिकांवर सुनावणी

उच्च न्यायालय राव यांच्याशी संबंधित तीन याचिकांवर सुनावणी करत होते. एका याचिकेत राव यांचा संपूर्ण मेडिकल रेकॉर्ड देण्याची विनंती करण्यात आली होती. दुसऱ्या याचिकेत आरोग्याच्या कारणास्तव जामीन देण्याची मागणी राव यांनी केली होती. तिसरी याचिका राव यांच्या पत्नी हेमलता यांनी दाखल केली होती, त्यात त्यांनी राव यांची देखभाल नीट होत नसल्याचे म्हटले होते.

या प्रकरणात झाली अटक

प्रकरण 31 डिसेंबर 2017 ला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये कथितरित्या भडकाऊ भाषण दिल्याचे आहे. पोलिसांचा दावा आहे की, वरवरा राव यांच्या भाषणानंतरच भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली होती असा आरोप होता. पोलिसांचा आणखी एक दावा असा आहे की, हे संमेलन नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या लोकांकडून आयोजित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...