आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ध्यामध्ये 5 दिवसांचा कडक लॉकडाऊन:बँक व शासकीय व निमशासकीय कार्यालय बंद; अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद, घरपोच सेवा सुरु

वर्धा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 ते दिनांक 13 मे सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाकडून लावण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित वाढती रुग्ण संख्या बघताच प्रशासनाकडून पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा आदेश काढण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा बंद राहणार तर घरपोच सेवा या कालावधीत सुरु राहणार आहेत. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे मृत्यूच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोटीचे प्रयत्न करीत आहे. बाजारपेठत वाढती गर्दी दिसून येत असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील 60 दुकानांना सील ठोकण्यात आले आहेत. तरी सुद्धा नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत असल्यामुळे दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 ते दिनांक 13 मे सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाकडून लावण्यात आला आहे.

या लॉकडाऊन मध्ये सर्व बँका, शासकीय व निमशासकीय कार्यालय, पेट्रोल पंप, भाजी बाजार, हॉटेल व किराणा दुकाना बंद राहणार आहेत. घरपोच सेवा सुरु राहणार मात्र, आरटीपीसीआर चाचणी करुन घेण्यात यावी. अहवाल निगेटिव्ह असेल तरच घरपोच सेवा पुरविण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. खाजगी रुग्णालय सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे, तर रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या रुग्णवाहिका व खाजगी वाहनांना पेट्रोल दिले जाणार आहेत. कृषी क्षेत्रातील शेयीपयोगी साहित्य व बी- बियाणे घरपोच देण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढले आहेत.

कोरोना आजाराची साखळीत खंड पडावा यासाठी अनेक प्रयत्न केले जात असून, जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतीचे प्रमाणात जास्त प्रमाणात आहेत. जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना विनाकारण घरा बाहेर पडू नका असे सातत्याने सांगितले जात असूनही, नागरिक बेजबाबदार पणे रस्त्यावर फिरताना दिसत असल्यामुळे जिल्ह्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...