आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:'भरोसा नसेल तर पोलिस सिक्योरिटी सोडा', युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'निरपराध, स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई सुरक्षित वाटत नाही'

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई शहर राहण्यासाठी सुरक्षित नसल्याचे ट्वीट केले, यावर आता युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

वरुण सरदेसाई म्हणाले की, 'मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंब मुंबई पोलिसांची सिक्योरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर !!”,' अशी प्रतिक्रीया सरदेसाई यांनी दिली.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनी लिहिले की, "ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळले जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. "

बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण केले जात आहे- रोहित पवार

सुशांत आत्महत्या प्रकरणात भाजप राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बिहारमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने पेटवला जात असल्याचे ही रोहित म्हणाले.

0