आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • VBA President Prakash Ambedkar Said Political Reservation Should Be Abolished, No Party Has The Courage To Abolish It

आरक्षण:राजकीय आरक्षण रद्द झाले पाहिजे; पण कोणत्याच पक्षात हे रद्द करण्याची हिम्मत नाही- प्रकाश आंबेडकर

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवरील अनुसूचित जातिी आणि अनुसूचित जमाती (एससी/एसटी) साठी आरक्षण संपवण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, वोट बँकेचे राजकारण आणि सत्ता गमवण्याच्या भीतीने कोत्याच पक्षात हे राजकीय आरक्षण संपवण्याची हिम्मत नाही.

प्रकाश आंबेडकरांना आरक्षणाच्या घटनात्मक तरतुदीबाबत विचारले की,  सुरुवातीला हे फक्त 10 वर्षांसाठी होते, यावर ते म्हणाले की, 'ही संविधानाची चुकीची धारणा आहे. दहा वर्षांच्या आरक्षणासाठी केलेली तरतूद राजकीय आरक्षणाची होती. हे (लोकसभा आणि विधासभेतील एससी/एसटीच्या) मतदारसंघांसाठी आरक्षण होते. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 मध्ये याची गरज नसल्याचे सांगितले होते.'

कोणत्याच पक्षात आरक्षण संपवण्याची हिम्मत नाही

ते म्हणाले की, नागरिकांनी मान्य केले आहे की, मतदान हा त्यांचा हक्क आहे आणि मतदारसंघ राखीव असो किंवा सर्वसाधारण, आपल्या मतदानाचा उपयोग केला पाहिजे. आंबेडकर पुढे म्हणाले की, ध्येय पूर्ण झाले आहे. आम्ही आणि अनेक आंबेडकरी जनता हेच बोलत आहे की, आता हे आरक्षण संपवले पाहिजे. पण ते भाजप असो वा कॉंग्रेस, ते संपविण्याची कोणाचीही हिंमत नाही.

'मी कधीच आरक्षणाचा फायदा घेतला नाही'

श्रीमंत लोक या आरक्षणाचा लाभ घेत आहेत असे जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा आंबेडकर म्हणाले, ‘मी कधीच आरक्षणाचा फायदा घेतला नाही. मी सर्वसाधारण जागेवरुन निवडणूक जिंकलो होतो.’ परंतू, नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाबाबत ते म्हणाले की- ‘घटनेच्या अनुच्छेद 16 मध्ये प्रदान केलेला हा मूलभूत अधिकार आहे. जोपर्यंत हा मूलभूत अधिकार कायम राहील तोपर्यंत हे आरक्षण कायम राहील.’

बातम्या आणखी आहेत...