आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आक्रमक:नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, खासदार विनायक राऊत यांची मागणी; पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

रायगड, पुणे, नाशिक आणि जळगावात नारायण राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. नारायण राणे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबतचे पत्रही लिहले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. अशी भाषा सहन करु नये, शिष्टाचार राखला पाहिजे, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?
मुख्यमंत्र्यांना कोण सल्ला देतो हे त्यांनाच कळत नाही. ते आम्हाला काय सल्ला देणार, ते काय डॉक्टर आहेत? तिसऱ्या लाटेचा त्यांना कुठून आवाज आला, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची तुम्हाला माहिती नसावी, या शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...