आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:भंडारा कारागृहात कैद्यांत तुंबळ हाणामारी; प्रमाणापेक्षा जास्त भाजी मागितल्यामुळे घडला सगळा प्रकार

भंडारा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कारागृहात सकाळचे भोजन वाटप सुरू असताना एका बंदीवानाने प्रमाणापेक्षा जास्त भाजी मागितली. यावरून वाद निर्माण होऊन चार बंदीवानांनी दुसऱ्या कैद्याला हातबुक्क्या, लाथा आणि दगडाने मारहाण केली. शुक्रवारी घडलेली ही घटना शनिवारी उजेडात आली. शेख रफिक शेख रहेमान, महेश आगाशे, मोहम्मद अफरोज शेख, राहुल पडोळे या कैद्यांनी देवेंद्र सुखदेव राऊत (३५) या बंदीवानाला मारहाण केली. हे कैदी तुमसर येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडातील आरोपी असून, एक जण दुसऱ्या प्रकरणातील आरोपी आहे. हे सर्व जिल्हा कारागृहातील एकाच बॅरेकमधील आरोपी आहेत.

शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास देवेंद्र राऊत हे बॅरेक जबाबदार म्हणून भोजन वाटप करीत होते. यावेळी शेख रफिक शेख रहेमान याने जास्त भाजी मागितली. देवेंद्र राऊत याने जास्तीची भाजी देण्यास मनाई केली. त्यामुळे संतप्त शेख याने राऊत याला मारहाण करायला सुरूवात केली. या झटापटीत राऊत हा जमिनीवर कोसळला.

बातम्या आणखी आहेत...