आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाचा कहर:पंढरपुरात दगडी घाट कोसळून 6 ठार; आजी, आजोबांसह मामाच्या वाढदिवसाला आलेला भाचाही मृत्युमुखी

पंढरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रभागेशेजारी आडोशाला थांबलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
  • पुणे, सातारा, सांगलीत मुसळधार

चंद्रभागा नदीकाठावर नव्याने बांधण्यात आलेली दगडी घाटाची २० फुटी भिंत मुसळधार पावसात कोसळून आडोशाला थांबलेल्या ६ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश असून अन्य दोन महिलांची ओळख पटली नव्हती. मामाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या दहावर्षीय भाच्यासह मामा, आजी, आजोबा अशा एकाच कुटुंबांतील चौघांचा मृतांमध्ये समावेश आहे.

पंढरपूर भागात मंगळवारी रात्रीपासून दमदार पाऊस सुरू होता. रामबागेजवळ राहणारे गोपाळ अभंगराव (७०) यांचे कुटुंबीय चंद्रभागा नदीत होडीचा व्यवसाय करतात. मुलगा मंगेश (३०) त्यांना मदत करतो. पावसामुळे गोपाळराव व मुलगा मंगेश जेवणासाठी घरी जाऊ शकले नाहीत. गोपाळ यांच्या पत्नी राधाबाई (६५) नातू पिल्लू गोपाळ जगताप (१०, मुलीचा मुलगा) याच्यासह जेवणाचा डबा घेऊन वाळवंटात आल्या होत्या. हे सर्वजण पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत दगडी भिंतीच्या आडोशाला एका झोपडीत उभे होते. त्यावेळी भिंत कोसळली. यामध्ये या चौघांसह अन्य दोन महिलांचा मृत्यू झाला.

वाढदिवस ठरला घातदिवस :

मंगेश अभंगराव यांचा बुधवारी वाढदिवस होता. रात्री वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचा भाचा पिल्लू जगताप आलेला होता. आजीबरोबर तो आजोबा व मामाला डबा देण्यासाठी वाळवंटात आला होता. भिंत कोसळल्याने या चारही जणांना प्राणास मुकावे लागले.

... दुर्घटना टाळता आली असती :

चंद्रभागेच्या पात्राचे तीन मालक आहेत. वाळूचे पैसे महसूल खाते घेते, पाण्याचे परवाने जलसंपदा, स्वच्छतेचे काम पालिकेकडे होते. या भागातील अतिक्रमणाचा मुद्दा पालिकेकडेच आहे. पालिकेच्या लोकांनी वेळीच अतिक्रमण काढले असते तर ही दुर्घटना टळली असती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser