आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:मुंबई येथून आलेल्या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ; उपचारार्थ आलेली तरुणी कोरोना बाधित

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्धा जिल्ह्यात सहा रुग्ण आढळून आले आहेत

जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृतक महिला व वाशिम जिल्ह्यातील वृद्ध रुग्ण आढळून आले होते.त्याच बरोबर दिनांक १८ मे रोजी मुंबई येथून आलेले तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, उपचारार्थ दाखल करण्यात आलेली २१ वर्षीय तरुणी  कोरोना बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

एका ३५ वर्षीय मृतक महिलेचा अहवाल येण्या आधीच तिचा मृत्यू झाला होता.तर वाशिम जिल्ह्यातील ६५ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असता त्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याचे सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगितले जात होते.दिनांक ११ मे रोजी नवी मुंबई येथून आर्वी तालुक्यातील जामखुटा येथे तिघे जण दाखल झाले होते.आरोग्य विभागाला माहिती मिळताच त्या तिघांना गावातील असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील आवारात विलगिकरणात ठेवण्यात आले होते.दिनांक १८ मे रोजी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्या तिघांना सेवाग्राम रुग्णालयाततील अलगिकरण कक्षामध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे.

नवी मुंबई मधून येथून आर्वी  तालुक्यातील जामखुटा या गावात आलेल्या तिघांना विलगिकरणात ठेवण्यात आले असल्यामुळे मोठा धोका टळला गेला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.त्याच बरोबर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील २१ वर्षीय तरूणी ही सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली होती.तिचा स्त्राव तपासणी करिता पाठविला असता, दिनांक १८ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून,जिल्ह्यात  चार कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण सहा झाले असून,यामध्ये एक मृतक आहेत. जिल्हा ग्रिन झोन वरुन ऑरेंज झोनकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र निर्माण होत आहेत. विलगिकरणात ठेवण्यात आलेल्या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने, आर्वी तालुक्यात लॉकडाऊनची परिस्थिती कायम राहणार आहेत.कोरोना बाधित रुग्णांना जामखुटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आले होते. तिघे कुणाच्या संपर्कात आले होते का याकडे आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष केंद्रीय केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...