आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातमोडे हत्याकांड:मुख्य आरोपी मृतकाच्या पत्नीला म्हणतो- नाना पाटेकरांना ओळखता का? 3 हजार रुपये महिना मिळवून देतो; तीनही आरोपींचा मुक्काम कोठडीत​​​​​​​

वर्धा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा शहरात चर्चेचा विषय बनला असलेला हातमोडे हत्याकांडामधील मुख्य आरोपी मृतकाच्या घरी जाताच मृतकाच्या पत्नीला म्हणतो, नाना पाटेकरांना ओळखता का, त्यामधून तुम्हाला तीन हजार रुपये मिळवून देतो असल्याचे सांगताच पत्नीने नकार दिला. मृतक वसंत चोखोबाजी हातमोडे वय ६५ वर्ष यांना दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी हत्याकांडमधील मुख्य आरोपी भास्कर इथापे यांचा मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता फोन आला असल्याचे मृतकाने मृतकाच्या पत्नीला सांगितले, त्यानंतर ते वर्धेकडे निघाले.

वर्धेकडे आल्यानंतर ते घरी परत आले नसल्यामुळे दिनांक ६ ऑक्टोबर बुधवार रोजी सावंगी पोलिस ठाण्यात मृतक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मृतक घरी परत आले नसल्यामुळे मुख्य आरोपी भास्कर इथापे दिनांक ११ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळच्या सुमारास घरी आले आणि तुम्ही नाना पाटेकर यांना ओळखता का,अशा प्रकारची विचारणा मृतकाच्या पत्नीला करण्यात आली. तुम्ही दोन फोटो, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक द्या त्यामधून तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये मिळवून देतो असे सांगताच मृतकाच्या पत्नीने सरळ त्या रक्कमेला विरोध दर्शविला व इथापे वर्ध्येकडे निघताच मृतकाच्या पत्नीने मला सुद्धा शहरात जायचे असल्याचे सांगूण दोघेही वर्ध्येकडे जाण्यासाठी निघाले असता वाटेतच इथापे यांनी सावंगी रुग्णालयात काम असल्याचे सांगूण मला त्या ठिकाणी उतरुन देण्यात आले असल्याची माहिती मृतकाच्या पत्नीने दिव्य मराठीला दिली.

मृतकाची हत्या केल्यानंतर तब्बल सात दिवसांनी मृतकाच्या घरी जाऊन सांत्वन करण्याचे नाट्य सुध्दा आरोपीने रचले असल्याचे समोर आले आहेत. कोंबडीची पार्टी करायची आहेत असे कारण पुढे करीत मृतकाला बोलावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मृतकाला ज्या वाहनातून घटनास्थळी घेऊन जाण्यात आले होते, ते वाहन क्रमांक एम एच ३० ए एफ ४५१५, दुचाकी, हत्या करण्यात आलेला चाकू व कपडे पोलिसांनी इथापे यांच्या घराची तपासणी केली असता ते सर्व जप्त केले असून मृतकाची कोणत्या पद्धतीने हत्या केली यासाठी तीनही आरोपींचा मुक्काम पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...