आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:बचत गटांच्या 109 सखी देताहेत बँकेत सेवा; वाढत्या गर्दीवर नियंत्रण, गाव स्तरावर देणार सेवा

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने टाकलेले पैसे काढण्यासाठी नागरिक करताहेत गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा उडतोय फज्जा

लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होताच अनेक कामगारांचे काम बंद झाल्याने, केंद्र सरकारने प्रत्येकांच्या बँक खात्यात इतर योजने अंतर्गत पैसे जमा करण्यात आले आहे. पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली जात असल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होत असल्याने, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बचत 109 सखी गाव स्तरावरील बँकेत सेवा देत आहे.

केंद्र सरकारने जनधन योजना व इतर योजनेअंतर्गत नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. पैसे काढले नाहीत ते पैसे परत जाणार असल्याची अफवा पसरवून दिशा भूल केली जात असल्यामुळे बँक समोर पैसे काढणाऱ्यांनी एकच गर्दी केली असल्यामुळे, सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरणाचा पादुर्भाव रोखण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून माक्स व सॅनिटाझर तयार करण्यात आले होते.पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असल्याने, जनधन योजनेसह इतर योजनाचे पैसे काढण्याकरिता ग्राहकांची बँकामध्ये मोढ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, वर्धाद्वारे सिद्धार्थ भोतमांगे -जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन यांनी वर्धा जिल्हात कार्यरत १०९ बँक सखी यांना गावस्तरावर काम करण्याच्या सूचना देऊन योग्य सामाजिक अंतर ठेऊन महिलांना जनधन योजना व इतर योजनेची घरपोच सेवा देण्यास सुरवात केली आहे.

याकरिता सचिन ओम्बासे मुख्य कार्यकरी अधिकारी, जि.प वर्धा, सत्यजित बडे प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वी.य.वर्धा तसेच स्वाती वानखेडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, सिद्धार्थ भोतमांगे - जिल्हा व्यवस्थापक - आर्थिक समावेशन, मनीष कावडे जिल्हा व्यवस्थापक - मार्केटिंग उमेद अभियान अंतर्गत तसेच तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशान, विलास झोटिंग, प्रकाश पोलखडे, वर्षा कोहळे, रामचंद्र चोपडे, शुभागी महल्ले, तसेच इतर अधिकारी यांच्या अंतर्गत मार्गदर्शन चालू आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग धंदे पूर्णपणे ठप्प पडलेले आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे आणि गोरगरीबांची मोठी परवड होत आहे. संचारबंदीत काळात त्यांची परवड होऊ नये यासाठी केंद सरकारने जनधन योजनेच्या महिला लाभार्थ्यांना बँक खात्यावर पाचशे रुपये जमा करण्यात आले. तर श्रावण बाळ, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे देखील त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे. आपल्या खात्यावर जमा झालेले पैसे काढण्याकरिता लाभार्थी बँकेत गर्दी करतांना दिसत आहे. खात्यात जमा झालेले पैसे 15 दिवसात न काढल्यास परत जाईल अशी अफवा पसरली असल्याने, महिला व इतर लाभार्थी बँकेत गर्दी करीत आहे. यामुळे बँकेसमोर लांबच लांब राग लागत आहे. सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होत असल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, वर्धाद्वारे उमेद अंतर्गत सर्व तालुक्या अंतर्गत कार्यरत 109 बँक सखी यांना गावस्तरावर बँकेच्या सेवा पुरविण्याबाबत सांगण्यात आल्या असून गावस्तरावर त्या सेवा देत आहे. आहे त्यामुळे गावस्तरावर व तालुकास्तरावर असणाऱ्या शाखामध्ये गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यामुळे हि सेवा त्यांना त्यांच्या गावात व घरपोच मिळत आहे. त्यामुळे लाभार्थीना कुठेही न जाता गावातच हि सेवा घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्यात कोरोना बाधित होऊ नये म्हणून मास्क घालणे अनिवार्य केल्यामुळे  उमेद अतर्गत महिला बचत गट मास्क तयार करून विक्री सुद्धा करीत आहे. कोरना  प्रतीबंधनात्मक उपाययोजना म्हणून मास्क लावणे सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो आहे.

बातम्या आणखी आहेत...