आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धा:समृद्धी महामार्गाच्या मोहात अडकलेल्या तिघांकडून 'त्या' 65 वर्षीय वृद्धाची हत्या, सात दिवसांची सुनावली कोठडी; खुनात कामगार नेता मुख्य आरोपी

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य आरोपी भास्कर इथापे वर्धा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनीता इथापे यांचे पती असून जिल्ह्यातील कामगार नेते आहेत.

समृद्धी महामार्गाचा मायाजाल जिल्ह्यात पसरलेला आहेत. अशातच शेत जमिनीचे बनावट वारसदार दाखवून आर्थिक रक्कम हडपण्याच्या डावात समृद्धीच्या मोहात अडकलेल्या तिघांनी बेपत्ता असलेल्या त्या 65 वर्षीय वृद्धाची हत्या केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि सावंगी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

शेतामधून समृद्धी महामार्ग जात असल्यामुळे शेत जमिनीचे बनावट दस्ताऐवज सादर करीत वारसदार असल्याचे दाखवून 45 लाख रुपयांची पहिला हप्ता जमा करण्यात आला होता. याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यामध्ये 2019 रोजी तक्रार नोंदवली असता, मृतकावर व दोन आरोपींविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करताच, त्या प्रकरणाचा निवाडा पुलगाव न्यायालयात सुरु होता. मुख्य आरोपी इथापे हे बँक व्यवस्थापकाला हाताशी धरून मृतकाच्या बँक खात्यामधून 30 लाख रुपयांचा आरटीजीएस करीत ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळती केली होती.

शेत जमिनीचा दुसरा हप्ता मिळणार असल्यामुळे मृतक वसंत चोखोबा हातमोडे वय 65 वर्ष रा. पालोती यांना आरोपींकडून बोलाविण्यात आले असल्याचे बोलले जात आहेत. त्यानंतर मृतक घरामधून बेपत्ता झाले असल्याची तक्रार मुलगा निलेश हातमोडे यांनी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सावंगी पोलिस ठाण्यात दिली होती. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रोठा शिवारातील तलाव परिसरात मच्छीमारांना दुर्गंधी येत असल्याची माहिती सावंगी पोलिसांना देण्यात आली होती. या आधारे पोलिसांनी तलाव परिसरात पाहणी केली असता, 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह सीमेंटच्या खांबाला बांधून असल्याचे दिसून आले. मृतदेह तलावाच्या बाहेर काढल्यानंतर मृतकाची ओळख पटविण्यासाठी पालोती गावात माहिती घेतली असता, मृतदेह बेपत्ता झालेल्या हातमोडे वृद्धाचा असल्याचे समजले. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. समृद्धीच्या मोहात अडकलेले मुख्य आरोपी भास्कर दादाराव इथापे वय 59 वर्ष रा सिंदी मेघे वर्धा, विलास गोमाजी मुन वय 55 वर्ष रा बरबडी व दिलीप नारायण लोखंडे वय 61 वर्ष या तिघांनी 65 वर्षीय वृद्धाची हत्या केली असल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहेत.

कोठडीतील तीन आरोपींना मिसळचा पाहुणचार

65 वर्षीय वसंत चोखोबाजी हातमोडे यांच्या हत्येतील तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्यामुळे त्या तिघांना उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात उभे केले होते. त्यानंतर तिघांना प्रशासकीय इमारतीच्या आवारातील हॉटेलमध्ये मिसळचा पाहुणचार देण्यात आला. पोलिस कोठडीत असतानाही सुद्धा पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक दिली असल्याचे दिसून आले आहेत.

बेपत्ता झाला असल्याचे रचले नाट्य; पडदा घालण्यासाठी स्वतःच देत होते जाहिरात

मृतक वसंत हातमोडे यांना विलास मुन याने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी शहरात बोलावून घेतले होते. मृतक घरी आले नसल्यामुळे मृतकाचा मुलगा आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन मृतक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मृतक हातमोडे बेपत्ता झाले असल्याचे नाट्य रचत या प्रकरणावर पडदा पडावा यासाठी स्वतःच एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना जाहिरात देण्यासाठी संपर्क साधला होता.

तीन न्यायालयात सुरु होता प्रकरणाचा निवाडा

मृतक वसंत हातमोडे यांच्या नावाने बनावट दस्तऐवज तयार करीत साडेसहा एकर जमीन नावाने करण्यात आली होती. आशिष पंजाबराव झोडे रा सेवाग्राम यांनी याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पुलगाव न्यायालयात फसवणूकीचा गुन्हा, वर्धा तहसीलदार यांच्याकडे आठ वारसदारांची तक्रार तर मृतकाच्या नावाने बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या शेतीवर मृतकाची शेती असल्याचा दावा वर्धा न्यायालयात करण्यात आला होता.दाव्या संबंधीत सर्व खर्च आरोपींकडून पुरविला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...