आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील मान्सून सध्या परतीच्या मार्गावर आहे. पण, जाता-जाता पाऊस परत एकदा राज्याला झोडपण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवस राज्यात अतीमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या पावसाने अनेक जिल्ह्यात शेतीच्या कामाला ब्रेक लावलाय. तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आज पाऊस बरसला. कापणीला आलेल्या पिकांवर त्याचा दाट प्रभाव होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मागील काही दिवसांपासून पाऊस थांबला होता, पण वातावरण बदलल्याने पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटली आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळ पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.