आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशिम:मंगरुळपीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, विरोधी पक्षनेते फडणवीस व पालकमंत्री देसाई यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

वाशिम18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी शुक्रवारी पालकमंत्री शंभूराजे देसाई तर आज शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन आर्थिक मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

मंगरुळपीर तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकासह तुरीचे व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले झाल्याने त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णतः खचला आहे अशा विपरीत परिस्थितीमध्ये नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले तर दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे व्यथा जाणून घेतल्या यावेळी नुकसान ग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशीम श्री शंभूराज देसाई यांच्या वाशीम दौऱ्यादरम्यान ग्राम शिवणी येथे अतिव्रुष्टिमुळे झालेले पिक नुकसान पाहणी केली.

शेतक-यांशी संवाद साधतांना पालकमंत्री म्हणाले शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करेलच,असे आश्वासनही दिले.

अंदाजे 10 हजार हेक्टरला नुकसानीचा फटका

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अंदाजे 10 हजार हेक्टरला नुकसानीचा फटका बसला असून हा आकडा पुढे वाढूही शकतो. अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या जमिनी खरवडल्या गेल्या. त्यामुळे मदतीची शेतक-यांची मागणी आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत मदत करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासन शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शासन मदत जाहीर करेल.

पाहणी दरम्यान कृषी अधिकारी , तहसीलदार यांच्यासह गावपातळीवरील कर्मचारी सहित शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख विवेक नाकाडे,शहर प्रमुख सचिन परळीकर,उपशहर प्रमुख ग्यानूभाउ भडांगे,युवासेना शहर प्रमुख सुनील कुर्वे,शहर प्रसिद्धि प्रमुख सुनील सरदार,संजय कातडे, भा ज पा चे पुरूषोत्तम चिटलांगे,सुनिल मालपाणी, रवी ठाकरे, श्याम खोडे,सचिन पवार, अभिषेक दंडे, गोपाल खोडके, आदींची उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...