आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुक:रत्नागिरीच्या व्यापाऱ्याची 14 लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या तामिळनाडूच्या व्यापाऱ्याविरुध्द वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथील हळद बाजारातून हळद खरेदी करून तामीळनाडूच्या व्यापाऱ्याकडे विक्री केल्यानंतर त्याने दिलेला धनादेश वटला नसल्याने रत्नागिरीच्या व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून वसमत पोलिसांनी कोईम्बतुर (तामीळनाडू) येथील व्यापाऱ्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायमन जोसेफ बेसकी असे या व्यापाऱ्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील हळद व्यापारी अमित कांतीलाल ओसवाल यांनी वसमत येथील हळद बाजारातून १५.७३ लाख रुपयांचे किंमतची हळद खरेदी केली होती. सदर खरेदी ता. २८ ऑगस्ट रोजी झाली. त्यानंतर ओसवाल यांनी सदर हळद परस्पर कोईम्बतुर (तामीळनाडू) येथील व्यापारी सायमन जोसेफ बेसकी यास विक्री केली. त्यावेळी १ लाख रुपये ओसवाल यांना रोख देण्यात आले. तर उर्वरीत १४.७३ लाख रुपयांचा धनादेश दिला.

मात्र ओसवाल यांनी बेसकी याच्याकडे वेळोवेळी दुरध्वनीवरून संपर्क साधून पैशाची मागणी केली. मात्र बेसकी याने पैसे देण्यास टाळाटाळ चालविली. त्यामुळे ओसवाल यांनी धनादेश बँकेत वटविण्यासाठी टाकला होता. मात्र बेसकी याच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटला नाही. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच ओसवाल यांनी तक्रार दाखल केली. यावरून वसमत पोलिस ठाण्यात सायमन जोसेफ बेसकी याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खार्डे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...