आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:'आम्ही मराठा समाजासोबत, पण त्यांना ओबीसीमधून आरक्षण नको'; माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची भूमिका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली. यातच ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी काही नेत्यांकडून होत असताना दिसत आहे. यामुळे राज्यात आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. यातच आता माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'आम्ही मराठा समाजासोबत आहोत, पण त्यांना ओबीसीमधून आरक्षण नको,' अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

माध्यमांशी बातचीतदरम्यान प्रकाश शेंडगे म्हणाले की, 'ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी काही नेते करत आहेत. या मागणीमुळे ओबीसी समाजातील छोटे समाज भयभीत झाले आहेत. यावरुन मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. आरक्षण मिळावे यासाठी ओबसी समाज मराठा समाजासोबत आहे, पण मराठा समाजाला ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण दिले जाऊ नये. या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर केले जाईल, अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी यावेळी दिली. तसेच, आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात सुरू असलेली मेगाभरती थांबवली पाहिजे, असेही शेंडगे म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser