आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साखर कारखाना निधी:आम्ही त्यांच्यासारखे सुडाचे राजकारण करणार नाही- धनंजय मुंडे

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील साखर कारखान्यांच्या निधीवरुन राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली आहे. ' 34 साखर कारखान्यांची थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात परळीच्या कारखान्याचाही समावेश आहे. आम्ही पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो, तरीदेखील आम्ही सुडाचे राजकारण कधीच करणार नाही,' असे म्हणत मुंडेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, 'महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती पाहुन ऊसाचे गाळप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परळीच्या साखर कारखान्याबद्दलही माझे वेगळे मत नाही. तो कारखाना उभा करण्यापासून नीट सुरू होईपर्यंत माझ्या वडिलांचे योगदान आहे. तो कारखाना बंद राहणे माझ्या मनाला पटत नव्हते. आता त्या कारखान्याचा चेअरमन वेगळ्या पक्षाचा असला तरीदेखील मी राजकारण करणार नाही. आम्ही कारखान्याला निधी देऊन विकासाचे राजकारण केले आहे. त्यांनीही आता कारखाना चालवावा आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करावी', असे मुंडे म्हणाले.

भाजपला चिमटा

मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, 'सत्तेत असताना भाजपने फक्त त्यांच्या लोकांच्या साखर कारखान्यांनाच मदत केली. आम्ही त्यांच्यासारखे करणार नाही. त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. राज्यातील सर्व कारखान्यांना मदत देण्यात आली आहे. राज्य सरकारसाठी ऊस उत्पादक शेतकरी कोणत्या एक पक्षाचा नसतो. म्हणून थक हमी देण्याचा निर्णय घेतला', असेही धनंजय मुंडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...