आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले', असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माहिती दिली. या पत्राचे पडसाद राज्यभर पडत आहेत. अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलन केले जात आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 'हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या पार्श्वभूमीवर ते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेटदेखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारण आणि प्रशासनातले गुन्हेगारी घटक एकत्र येऊन काय काय करू शकतात, हे आपण पाहत आहोत. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी 100 कोटी कसे वसूल करायला सांगितले हे स्पष्ट केले. हे एक मोठे नेक्सस उभे राहिले आहे. 22 तारखेला राज्यपालांनी आम्हाला वेळ दिली आहे. आम्ही त्यांना भेटून आमची बाजू मांडणार आहोत आणि हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी करणार आहोत', असे आंबेडकरांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.