आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • West Bengal Election News And Updates; Shiv Sena To Contest Assembly Elections In West Bengal; MP Sanjay Raut's Announcement

पश्चिम बंगाल निवडणूक:शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; खासदार संजय राऊत यांची घोषणा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेच्या बंगाल एंट्रीमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमिवर संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालचा दौरासुद्धा करणार आहेत.

शिवसेनेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार केल्यानं त्याचा भाजपला फटका बसू शकतो. पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा थेट सामना आहे. परंतू, आता शिवसेनेने निवडणुकीत एंट्री घेतल्यामुळे सामना रंगण्याची शक्यता आहे. शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये 100 जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...