आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लाबोल:शर्जिल उस्मानीला जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून शोधून आणणार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काय केले ? -देवेंद्र फडणवीस

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील यलगार परिषदेशी संबंधित सर्जील उस्मानीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच', असे विधानसभेत छातीठोकपणे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काय केले?' असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आपल्या पोस्टमध्ये फडणवीस म्हणतात की, 'आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले?'

'मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम 153 अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते. खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी ?' असा सवाल यावेळी फडणवीसांना लगावला आहे.

काय आहे प्रकरण ?

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शार्जिल उस्मानीने 'हिंदू समाज पूर्णपणे सडला आहे,' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी शरजिल उस्मानीचे वक्तव्य भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते, अशी तक्रार भाजपने पुणे पोलिसात केली होती.

बातम्या आणखी आहेत...