आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नव्या कृषी कायद्यावरुन सध्या देशभरात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमिवर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे. 'शिवसेनेला शेतीमधलं काय कळतं ? शेती हा त्यांचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही,'असा घणाघात निलेश राणे यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलत असताना केला.
राणे पुढे म्हणाले की, 'शिवसेना हा गोंधळलेला पक्ष आहे. शिवसेनेला आता उतरती कळा लागली आहे. दिल्लीत शिवसेनेला कुणीच किंमत देत नाही. अलीकडच्या काळात शिवसेना कोणत्याच एका भूमिकेवर ठाम राहिलेली नाही. एक दिवस असा येईल की, महाराष्ट्राची जनता त्यांना किंमत देणार नाही', अशी टीका राणेंनी केली.
'पवारांचा विरोध अनाकलनीय'
राणे पुढे म्हणाले की, 'कृषी कायद्यात बदल करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2010 साली केली होती. आता या कायद्यांना त्यांच्याकडून होणारा विरोध अनाकलनीय आहे. फक्त नरेंद्र मोदींनी हा कायदा आणला म्हणून त्याला विरोध केला जात आहे. फक्त पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील तीव्रता जास्त आहे. इतर कुठल्याही राज्यांमध्ये तशी परिस्थिती नाही', असा दावाही त्यांनी यावेळी केला.
11 वाजेपासून 3 वाजेपर्यंत राहणार चक्का जाम
शेतकरी कायद्यांच्या विरोधात 13 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीला चहुबाजुंनी घेरले आहे. आज भारत बंदाची हाक देण्यात आली आहे. 20 राजकीय पक्ष आणि 10 ट्रेड यूनियन्स भारत बंदाचा पाठिंबा देत आहे. शेतकऱ्यांनी म्हटले की, बंद सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि चक्का जाम सकाळी 11 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत राहिल. यामुळे ऑफिसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना अडचण येणार नाही. तसेच अँबुलेन्ससारक्या आवश्यक सेवा आणि लग्नाच्या गाड्यांना रोखले जाणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.