आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. सत्ताधारी शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पायउतार होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सत्तेत मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेत फूट पडल्याने या मागचा सूत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. शिवसेनेत फूट पाडणारे सूत्रधार हे एकनाथ शिंदे असल्याची चर्चा आहे. मात्र एकनाथ शिंदे आहेत तरी कोण? शिवसेनेत त्यांचे वजन एवढे कसे वाढले? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
कोण आहेत एकनाथ शिंदे?
जनतेचे नेते बनले एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा झेंडा हाथी घेतला तो आनंद दिघे यांच्यामुळेच. दिघेंनी 1984 मध्ये मध्ये शिंदे यांची किसन नगरच्या शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्या नंतर दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गरजवंतांना स्वस्तात धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी केलेले आंदोलन, टंचाईच्या काळात नागरिकांना पामतेल उपलब्ध करुन देणे, नागरीकांच्या समस्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केल्याने शिंदे जनतेचे नेते बनले.
सीमाप्रश्नावरुन भोगला तुरुंगवास
अनेक आक्रमक आंदोलनामुळे शिंदे यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. एवढेच नाही तर 1986 मध्ये सीमाप्रश्नावरुन झालेल्या आंदोलनात शिंदे यांनी आक्रमक पणे भाग घेतला होता. या आंदोलनामुळे शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी शिंदे यांनी बेल्लारी तुरुंगात 40 दिवसांचा कारावास भोगला होता.
एकनाथ शिंदेंचा राजकारणातील चढता क्रम
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.