आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढीव वीज बिल:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की अजित पवार ? प्रकाश आंबेडकर यांचा खोचक टोला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्राहकांनी बिल भरू नये- प्रकाश आंबेडकर

राज्यातील वीज बिलाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री नेमके कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार हे एकदा स्पष्ट करा, असा टोला आंबेडकरांनी लगावला. यासोबतच, ग्राहकांनी वाढीव वीज बिल भरू नये असे आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, महावितरणने सांगितले आहे की लॉकडाउनच्या काळात मीटर रिडिंगसाठी कंत्राट दिले होते. त्यांना बंदी घालण्यात आली नव्हती तर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मीटर रिडिंगच्याबाबतीत आमच्याकडून चूक झाली आहे. 50 टक्के वीज बिल माफीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवला आहे, असे महावितरणने सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. याशिवाय, वीज बिल माफीवरुन या सरकारने ग्राहकांची फसवणूक केली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser