आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर अनेकांचे नाव समोर येत असून, या प्रकरणाला वेगळच वळण लागलं आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर याप्रकरणावरुन अनेकांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनोटने बॉलिवूडमधील अनेकांची ड्रग्ज टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी तर थेट शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची ड्रग्ज चाचणी करण्याची मागणी ट्विटरवरून केली आहे.
Why just Ranveer and Ranbir I feel even Aditya Thakre should undergo random drug test. After all he has also been very cozy with Bollywood’s inner circle.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 2, 2020
राणेंनी ट्वीटमध्येलिहीले की, 'फक्त रणवीर-रणबीर यांनीच का, आदित्य ठाकरे यांनीदेखील ड्रग्ज चाचणी करावी. कारण, तेही बॉलिवूडमधील अनेकांच्या संपर्कात असतात,' असे ट्वीट निलेश राणेंनी केले आहे.
आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला ठणकावले
ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्विट ‘लाइक’ करण्यावरून कंगनाचे दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. मला मुंबई पोलिसांची भीती वाटते असे वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौटने केले होते. आता तिच्या या वक्तव्याचा माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी समाचार घेत तिला धारेवर धरले आहे.
निलेश राणे ट्विट मध्ये म्हणाले की, “दोन-तीन अधिकारी प्रेशरमध्ये आले, म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत (कंगना रनौट) कोण लागून गेली? अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही” असा इशारा निलेश राणे यांनी दिला.
2/3 अधिकारी प्रेशर मध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 3, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.