आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:चाकूने वार करत पत्नीचा खून; नंतर घेतला गळफास, सेनगाव तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथील घटना

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथे पत्नीवर चाकूने वार केल्यानंतर तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पतीने आत्महत्या केली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. सिंधुबाई सोपान पाचपिल्ले (५०) व सोपान कुंडलिक पाचपिल्ले (५५) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

सुकळी बुद्रुक शिवारातील आखाड्यावर सोपान कुटुंबासह राहत होते. घरी पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सोपाने पत्नी सिंधुबाई यांच्या पोटात, छातीत, हातावर चाकूने वार केले. त्यांनी आरडाओरड केली. या वेळी त्यांचा मुलगा ब्रह्मदेवने जखमी सिंधुबाईंना तातडीने उपचारासाठी सेनगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र त्यांचा प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना १४ रोजी सकाळी पावणेदहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून त्यांचा मृतदेह सुकळी बुद्रुक येथे आणण्यात आला. पत्नीच्या मृत्यूची माहिती कळाल्यानंतर सोपानने १४ ऑक्टोबरला दुपारी पोटात चाकूने वार करून घेत आत्महत्या केली. पाचपिल्ले कुटंुबाच्या नातेवाइकांनी आखाड्यावर जाऊन पाहणी केली असता सोपान यांचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणात आज पहाटे ब्रह्मदेव पाचपिल्ले यांनी सेनगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सोपानवर खुनाचा गुन्हा दाखल केला.

गावावर शोककळा
या घटनेत पत्नी सिंधुबाई यांचा खून करून आत्महत्या करणाऱ्या पती सोपान पाचपिल्ले या दोघांच्या मृतदेहावर सुकळी बुद्रुक येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे सुकळी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...