आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाथाभाऊ राष्ट्रवादीत:एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली-अजित पवार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले.

खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास अजित पवार यांनी दिला आहे.