आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसावर हल्ला:मुंबईमध्ये विना हेलमेट जाणाऱ्या महिलेला थांबवल्यामुळे ट्रॅफिक पोलिसाला केली मारहाण; दोन आरोपींना अटक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे

राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा 16 लाख 30 हजारांपेक्षा जास्त आहे. यात पोलिस कर्मचारी फ्रंटलाइनवर असून मागील 7 महिन्यांपासून दिवस रात्र ड्युटी करत आहेत. तरीदेखील पोलिसांसोबतच्या गैरवर्तनाच्या घटना कमी होत नाहीत. यातच आता मुंबईतून नवीन प्रकरण समोर आले आहे. महिलेला हेलमेट नव्हते म्हणून थांबवल्यामुळे महिलेने भर रस्त्यात ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेला आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे.

पोलिसांने अपशब्द वापरल्याचा महिलेचा आरोप

कलबादेवी मार्गावर ट्रॅफिल पोलिसाने एका महिलेला हेलमेट नव्हते म्हणून पकडले. यावेळी दोघांमध्ये थोडा वाद झाला. नंतर महिलेने पोलिसावर मास्क न घातल्याचा आणि शिवी दिल्याचा आरोप केला. प्रकरण इतके वाढले की, महिलेने भर रस्त्यात पोलिसाला मारहाण सुरू केली. यादरम्यान पोलिसाचे तेथे उपस्थित दुसऱ्या एका व्यक्तीसोबतही बाचाबाची झाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहिनुद्दीन खान (26) आणि सादिका (30) अटक केली असून, त्यांच्यावर कलम 353, 332, 504, 506, 34 सहित इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.