आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामुहिक बलात्कार:पतीसमोर पत्नीवर आळीपाळीने बलात्कार, सहा जणांना घेतले ताब्यात; 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

वर्धा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील विवाहित महिलेला नौकरीचे आमीष दिले, नंतर पतीला धमकी देत पतीसामोर पत्नीवर सहा आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना शनिवार (दि 27) जून रोजी सेलसुरा येथील शेतात असलेल्या फार्महाऊसवर घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदी रेल्वे येथील दाम्पत्य लॉकडाऊनमुळे अडचणीत होते. त्यांना काम नसल्यामुळे अनेक जणांकडे कामाची विचारणा करीत होते. अशातच त्यांना नोकरी असल्याचे सांगितले, पती-पत्नी दोघांनाही सावंगी मेघे येथे मुलाखत घेण्यासाठी बोलाविण्यात आले. आरोपींनी मुलाखत न घेता फार्महाऊसवर काम असल्याचे कारण पुढे करीत त्या दोघांना सेलसुरा येथे नेले. तिते, पीडित महिलेच्या पतीला बाहेर थांबवित महिलेला मुलाखती करिता आत घेण्यात आले. त्यातील एका आरोपीने महिलेसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली असल्याचे पीडित महिलेच्या पतीला समजताच पतीने आत जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर , त्याला बांधून मारण्याची धमकी देत त्या विवाहित महिलेवर सहा आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी बलात्कारानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. पीडित महिला व तिच्या पतीने सर्व घडलेली माहिती देवळी पोलिसांना सांगितली. 

घटना ऐकल्यानंतर पोलिस सुद्धा अचंबीत झाले. देवळी पोलिसांनी सावंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे सांगताच दोघांनीही सावंगी पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. देवळी व सावंगी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत तपासाला गती देताच आरोपींना रविवार (दि 28) जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पकडण्यात आले. याप्रकरणी शेखर सुरेश चंदनखेडे (वय 24, रा पवनार), लोकेश उर्फ अभिजत गजानन इंगोले (वय 24 रा तुकाराम वार्ड वर्धा), होमराज बाबाराव भोयर (वय 39 रा धारपुरे लेआऊट सिंदी मेघे),पनींदाकुमार श्रीनिवास बलवा (वय 26 रा सिंदी मेघे), नितीन मारोतराव चावरे (वय 27 रा खरांगणा गोडे)  व राहुल बनराज गाडगे (वय 28 रा खरांगणा गोडे) या सहा आरोपींना ताब्यात घेत कलम 376 (ड)अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून, 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रेवचंद शिंगणजुडे, यांच्या सह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...