आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई लोकलमध्ये बलात्कार:24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर चालत्या ट्रेनमधून फेकले; प्रकृती चिंताजनक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन दिवस महिला पटरीवर बेशुद्धावस्थेत पडली होती

मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले.

नवी मुंबईतील वाशीमध्ये मंगळवारी(22 डिसेंबर) ला 24 वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत रेल्वे ट्रॅकवर पडलेली आढळली. दोन दिवसानंतर तिला शुद्ध आल्यानंतर गुरुवारी तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि महिलेच्या सांगण्यावरुन बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या अंगावरील जखमांच्या आधारे आधी आम्ही आयपीसी कलम 307(हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर आम्ही 376 (बलात्कार) ची कलम त्यात जोडली. याप्रकरणी एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...