आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जुन्या प्रकरणात शिक्षा:पोलिसावर हात उगारल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे सरकारमध्ये महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ठाकूर यांना आठ वर्षांपूर्वी पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण केल्याप्रकरणी ही शिक्षा झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर अमरावतीमध्ये 24 मार्च 2012 रोजी पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसाशी हुज्जत आणि मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.