आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. यामध्ये अनेक नेते, आमदार, खासदार, डॉक्टर्स आणि अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
राज्यातील सर्वाधिक पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी '55 वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करा' असे आदेश दिले आहेत. तसेच यासंदर्भातील गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानही पोलिसांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते, तरीही या काळात जवळपास 500 पेक्षा जास्त पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यात मुंबई पोलिस दलातील जवळपास 123 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे आता लवकर खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.
मुंबईत 71 पोलिसांना कोरोना
मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत मुंबईत 9510 पोलीस कर्मचारी बाधित आढळले आहे. याशिवाय आजपर्यंत 123 पोलिसांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील पोलीस दल देखील पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये आता पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.