आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखक विचारवंतांना राजकारणाची खाज:प्रा. हरी नरके शिवसेनेचे प्रवक्ता होणार का?, भाजपची टीका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाहीच्या युगात बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मत व्यक्त करणे आणि चुकीच्या प्रवृत्तीवर प्रहार करणे हा व्यक्ति स्वातंत्र्याचा भाग आहे. व्यवस्थेच्या नावाखाली वास्तववादी भुमिका बाजुला ठेवुन पुरोगामी विचाराचे पाईक आहेत असे म्हणत काही लेखक राजकीय पक्षावर विचार मांडतात. तेव्हा ही मंडळी राजकारणात थेट प्रवेश का करत नाहीत? भाजप राज्य प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी प्रा. हरी नरकेंवर अशाप्रकारची टीका केली आहे.

पुढे बोलताना राम कुलकर्णी म्हणाले, प्रख्यात संशोधक, लेखक प्रा. हरी नरके नुकतेच मराठवाड्यात येऊन गेले. जाहिर कार्यक्रमात त्यांनी मांडलेले विचार अराजकिय वाटले पण लागल्या सवयीप्रमाणे देशात वर्तमान राजकिय परिस्थिती असुरक्षित असल्याचे भाष्य केले. एखाद्या पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर लेखक जेव्हा तोंडसुख घेतात नव्हे तर आपण विरोधी पक्षाचे प्रवक्ते आहोत या आविर्भावात थेट पक्ष नेतृत्वावर हल्ला चढवतात.

प्रवक्ता पद का घेऊ नये?

राम कुलकर्णी म्हणाले, सर्वमान्य नेत्याच्या विरोधात केवळ प्रसिद्धीसाठी काहीतरी बरळावे ज्यामुळे वाढत्या वयात आपले नाव झळकेल अशी समजुत असु शकते. त्यापेक्षा राजकारणाची खाज असलेल्या लेखकांनी एखाद्या पक्षाची किंवा त्या नेतृत्वाची चमकोगिरी करताना दुसर्‍या पक्षाच्या नेतृत्वावर टिका करण्यापेक्षा थेट शिवसेनेत प्रवेश करून प्रवक्ता पद का घेऊ नये? असा सवाल नरके यांना केला.

परिवर्तन का दिसत नाही?

भाजप प्रवक्ते म्हणाले, नरके एक विचारवंत आणि प्रसिद्ध लेखक म्हणुन ओळखले जातात. त्यांचं वक्तृत्व आणि मांडत असलेले विषय सामाजिक जनजागृतीसाठी शिवाय नव्या पिढीला काही आदर्श सांगण्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. त्यांना सध्याच्या राजकिय परिस्थितीत देशात सर्व स्तरावर झालेले परिवर्तन का दिसत नाही?

शिवसेना प्रवक्त्याचे विचार

हरी नरके यांनी भाजपला शिवसेना संपवायची आहे सोशल मिडियावर या मथळ्याखाली मांडलेले विचार म्हणजे भविष्यात हरी नरके निश्चित शिवसेनेचं मांडलीकत्व किंवा प्रवक्ते पद स्विकारतील हे लक्षात येतं. देवेंद्र फडणवीसांना आपल्या लिखाणात आणि बोलण्यात ते लक्ष्य करतात. मग शिवसेनेला पाच वर्षे अपमानित केले. काश्मिरमध्ये मुफ्तीसोबत युती किंवा राज्यात अंधारात केलेला शपथविधी हे विचार म्हणजे एखाद्या लेखकाचे नव्हे तर चक्क पुण्यात बसुन शिवसेनेचा प्रवक्ता बोलण्यासारखेच म्हणावे.

यांना एकही नेता चांगला वाटत नाही

खरं तर विचारवंतांनी स्वत:ला राजकिय क्षेत्रापासुन चार हात दुर ठेवणे महत्वाचे. पण राजकारणाची खाज अनेकांना असते. त्यापैकी हे एक म्हणावे. भाजपात गल्ली ते दिल्ली एकही नेता त्यांना चांगला वाटत नाही. ज्या किरीट सोमय्यांनी भ्रष्ट व्यवस्थेवर आवाज उठवला खरं तर अशा विचारवंतांनी किमान त्यांचे स्वागत करायला हवे.

शिवसेनेचे कडवे सैनिक

हरी नरकेंना राजकारणातले काही नेते अगदी कर्तृत्ववान वाटतात. त्याच मंडळींनी सत्तेत असताना आरक्षण लोंबकळत ठेवले. त्याला जाब विचारायला लेखक हरी नरके तयार नाहीत याला काय म्हणावे? त्यांच्या तोंडी आणि लिखाणातुन आलेली राजकिय भाषा म्हणजे खरोखर हिंदुत्वाचा पुळका तथा शिवसेनेचे कडवे निष्ठावान सैनिक म्हणुन त्यांचा गौरव करावा असेच म्हणावे लागेल.

सुधारणेकडे घेऊन जाणारा काळ

विचारवंतांनी पडद्यामागुन राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्ष राजकिय मैदानात उतरून हौस फेडली तर मग निश्चित कळेल. काय तर म्हणे आम्हाला भाषण केल्यानंतर सुरक्षित जायचे असते. अरे बाबा, वर्तमान देशाच्या व्यवस्थेत असलेला पर्व काळ हा खर्‍या अर्थाने सार्‍या व्यवस्थेला सुधारणेकडे घेऊन जाणारा आहे.

बातम्या आणखी आहेत...